Skip to main content

Posts

Featured

एक नदी वाहत असते आपल्यात निरंतर…

एक नदी वाहत असते आपल्यात निरंतर… नदी हा सृष्टीतला आदिम आणि निरंतर वाहणारा घटक. वाहते ती नदी. नाद करते ती नदी. नदीला ‘सदानीरा’ ही उपमा अतिशय समपर्क आहे. कारण थांबलेली , तुंबलेली किंवा कोरडीठण्ण झालेल्या नदीची कल्पनाही करवत नाही. वाहत राहणे हा नदीचा धर्म आहे. नदी वाहते म्हणजे ती जीवंत आहे. तिच्या उदरात हजारो जलचर केवळ तिच्या वाहण्यामुळे जीवंत राहू शकतात. ती वाहते तोवर तिच्या काठी माणसं- जीव-जनावरं राहू शकतात. नदी आपल्याला पोसते. मानवी संस्कृती नदीनेच तर समृद्ध केली आहे. नद्यांना पृथ्वीच्या रक्तवाहिन्या म्हटलं तरी वावगं ठऊ नये. नदी आपल्यामध्ये भलं-बुरं सारं काही सामावून घेते. ती निर्मळा , जलदायिनी , जीवनदायिनी आहे. नदी देत राहते निरपेक्ष. भारतात नदीला आईचं स्थान आहे. गंगामैया , गिरणामाई , तापीमाय अशा नावानं नद्यांना संबोधल जातं. पुरानातही नद्यांची महती गायिली आहे. ती अगाध अनंत अमर्याद आहे म्हणून तर आपल्याकडे ‘‘साधूचे कूळ आणि नदीचे मूळ पुसू नये’’अशी म्हण प्रचलित आहे. प्रत्येक नदीचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येकीला स्वतःची ओळख असते. नाव असतं. प्रत्येक नदीत काही प्रमाणात मासे आणि इतर

Latest Posts

स्मृतीप्रियेचं वाहतं गाणं

■ नदीच्या लेकी

नदी जगलेला माणूस

■ धार आणि काठ